आईचं मुलाला पत्र 

हे पत्र वर्गातील मुलांनी आईच्या भूमिकेत शिरून मुलाने आईला लिहिलेल्या पत्राला उत्तर म्हणून लिहीलेल आहे. या पत्रलेखनात वर्गातील अनेक मुलींनी छान कल्पना केली. स्त्री पात्रातील खुब्या शेवटी स्त्री मनालाच योग्य कळतात.

समोरासमोर बसून ज्या विचारांची चर्चा आई आणि मुलगा करू शकत नाही असे विषय फारच थोडे असतात. त्यात जे प्रामुख्याने टाळले जातात ते व्यसन, लैंगिकता व प्रेमसंबंध इतकेच असतात. या पलीकडेचे सर्व जवळपास विषय आई व मुलगा या नात्यात संवादासाठी खुले असतात. आता त्या मुद्द्यावर पक्के मित्र सोडले तर इतर कोणाशीही बोलायची फार काही जागा नाही आणि मास्तरांना त्यांच्या विषयी अजिबात माहीत नाही, असही नाही.

आईचं पत्र 

mother with son

1. निरागसपण

स्त्री मनाच्या स्वरूपाचा अंदाज तुलाच काय पण तुझ्या बापाला पण लावता येणार नाही. कारण शेवटी तोही  एक पुरुषच. एका स्त्रीला एक स्त्रीच फार फार तर समजून घेण्याचा प्रयत्न करू शकते. कारण बर्‍याचदा आम्हा स्त्रीयांना काय वाटतं हे अनेकदा आमचंच आम्हालाच कळत नसतं. प्रत्येक आई आपल्या मुलासाठी निरागसच असते पण ती बायकोच्या भूमिकेत मात्र भावनिक मूर्खतेच्या पातळीवर उभी असते. प्रत्येक मुलाला पहिलं प्रेम त्याची आई असल्याने तीच्या विषयी त्याला फार तटस्थ होता येत नाही. त्याचा निश्चित आम्हा आयांना लाड असतो. मुलींच्या बाबतीत मात्र प्रकरण थोडं वेगळे असत. तिथं आमचा निरागसपणा फार काम करत नाही. त्यांना त्यांच्या स्वप्न रंजनात अडथळाच वाटत असतो. म्हणजे मला माझी आई पण खूप जवळची असली तरी काही वेळा ती तशी वाटतच होती. 

2. वेगवेगळ्या भूमिकेत 

daily work at home

सासू सूनच हे तेच नातं असतं जे मायलेकीच असत. बस फरक इतकाच असतो की तीव्रता जास्त असते आणि एका पुरुषाची दखल त्यात महत्त्वाची ठरते. आई लेकीच्या नात्यात पुरुष येत नाही. त्या नात्यात कधी बाप येत नाही, भाऊ पडत नाही, जावई असला तर तो आमच्यामध्ये यायचा प्रश्नच नसतो. सासू-सुनेच्या निम्म्याहून अधिक कटकटीच मुळी जन्माला येतात त्या तो पुरुष जिंकण्याच्या शर्यतीतून. ज्याला एकीने जन्म दिलेला असतो आणि दुसरीला तो जन्मभर हवा असतो. तिथे कितीही प्रेम केलं एकमेकींवर तरी त्यात एक शर्यतीचा पैलू असतोच जो कधीही शांत होत नाही. बऱ्याचदा आपल्या काहीही न कळणाऱ्या आईला बायकोशी भांडतांना पाहिलं की हीच का ती आपली शांती आई हा प्रश्न पडतो लेकरांना. तसा तो तुला ही पडेल म्हणा, एकदाच होऊ दे तुझे दोनाचे चार हात. 

3. स्त्री मनाची नजर

नात्यातील व्यक्तिवर डोळे मिटून प्रेम करायच असत. फरक पडतो तो इथे, पुरुषांनी प्रेमात डोळे मिटलेत की त्यांना फार काही दिसत नाही आणि स्त्रियांनी डोळे मिटले की त्यांना संबंधातील व्यक्तीच्या मनातला काळोख दिसायला लागतो. पुरुषांनी पूर्ण विचार करून एखादी भूमिका घेतली कि ती बऱ्याच वेळेला जशी योग्य असते तसेच स्त्रीने डोळे मिटून अंतकरणात येणाऱ्या काळजी बद्दल शंका समोर ठेवली की त्यातून निर्माण होऊ शकणारा धोका टाळता येऊ शकतो. खरंतर प्रत्येक नात्यात एक छुपा स्वार्थ असतो. प्रेमाचे झालर लावून तो स्वार्थ लपवला जातो. एकदा का तो स्वार्थ वाढायला लागला की त्याची जाणीव सर्वात आधी होते ती स्त्रियांना. पुरुषांना मात्र त्याची झळ पोहोचते तोवर पाणी डोक्यावर गेललं असते.

4. आमच राजकारण

घरच्या राजकारणात आणि राज्याच्या राजकारणात असलेला एक महत्त्वाचा फरक म्हणजे प्रेमाचा संबंध नसणं. घरात जेव्हा राजकारणाचे डावपेच चालतात तेव्हा सर्वस्वपणाला लावून ते घाणेरड होऊन जात नाही. जसं राज्याच्या राजकारणात होतं. पण दोन्ही राजकारणात एक समान बिंदू म्हणजे पैसा, स्त्रियांकडे तो फार काही नसतो, पण त्यातून मिळणारी चैन  आणि ताकत ती सगळ्यांनाच हवी असते. दुसरी आणि महत्त्वाची बाब म्हणजे तांत्रिक बाबी ज्यांची गुंतागुंत. ह्या किचकट बाबीमुळेच खऱ्या अर्थाने सर्वसामान्य पुरुषांना राजकारण समजायला जड जाते, त्या ठिकाणी घरबाहेरच्या व्यवहारचा फारसा अनुभव नसलेल्या स्त्रियांकडून राजकारणात सक्रीय सहभागाची अपेक्षा करणं मस्करी होईल. घरची पूर्ण जबाबदारी घेण हा फक्त फुल टाईम जॉब नसतो तर ओवर टाईम जॉब असतो. राजकारण करण्यासाठी स्त्री व पुरुष दोन्ही समान सक्षम असताना देखील कोणाला किती वेळ मिळतो यावर या गोष्टी अवलंबून असतात. परिस्थिती कोणाला कुठं उभ करेल यावरून समोरचा मार्ग ठरत असतो. 

5. प्राधान्यक्रम 

Book self

दोन्ही गोष्टी एकाच मुद्द्यावर आधारित आहेत रिलेटिबिलिटी. एक गृहिणी म्हणून जे जे आजूबाजूला दिसत. ज्या चर्चा होतात त्या एकमेकींच्या वैयक्तिक जीवनावर आधारित असतात, तेच टेलिव्हिजन वरच्या मालिकांमध्ये, तेच शेजार-पाजारच्या मित्रमैत्रिणींमध्ये. तू वाचत असलेली वृत्तपत्र, मासिक, पुस्तक ह्या आमच्या जीवनातील अनुभवाशी आणि कार्याशी फारसा संबंधित नसलेल्या असतात. जिथे संबंध सापडला नाही तिथ अर्थ सापडत नाही, जिथे अर्थ सापडत नाही तिथे सुरू होतो कंटाळवाणा खेळ आणि जिथे संबंध सापडतो तिथे त्याचे उपयोग कळतात, तिथे त्याचा अर्थ जमेल तसे काढता येतात. मग त्याच प्रतिबिंब फक्त युट्यूब वरच्या होमपेजलाच दिसत नाही तर व्हाट्सअपच्या च्याट्समध्ये पण दिसतात. आपण फार काही वेगळं पाहत नसतो, मला तर वाटतं की आपण जे आतुन असतो, तेच तिथे हळूहळू सुचवायला लागतं. तसं युट्यूबच्या आरत्या, सौंदर्यप्रसादानाचे व्हिडिओ किंवा कपड्यांच्या नवनव्या माहितीची व्हिडिओ सुचवले जातात. हे सगळं या पत्रात लिहून मास्तरांना समोर सांगायची गरज नव्हती, मला एकट्यात सांगता आल असत. जाऊ दे म्हणा जर मास्तरची बायको सर्वसामान्य मराठी गृहिणी असेल तर तिचा मोबाईल पण आमच्यापेक्षा वेगळा असण्याचे कारण नाही. 

6. फॅमिली टाईम 

तुझ्या फॅमिली टाईमबद्दलचे व्हाट्सअप स्टेटसच सांगत असतात की तुला किती इच्छा असते सगळेजण मिळून एखाद्या चित्रपट पाहायची. खरंतर कंटाळा येतो मला एका जागेवर बसून त्या टेलिव्हिजन वरच्या पडद्याकडे बघत बसायचा. मला मनोमन वाटतं की आपण एखादा चित्रपट पाहतो, तेव्हढ्या वेळात लसूण सोलून होईल किंवा कोथिंबीर पण निसून होईल, पालेभाज्या चिरून होईल, असेलच तर शिवण काम आटोपून होईल, पण हे सगळं बोलले तर उगीच तुझा भ्रमनिरास व्हायचा, म्हणून मी या पत्रातून आपलं मत मांडातेय.

7. स्त्री जीवनाचा अर्थ 

अरे बाळा स्त्री जीवनावर अनेक लेखकांनी, अनेक कवींनी, विचारवंतांनी, समाजशास्त्रज्ञांनी आयुष्य खर्ची घातलं आणि त्यातून त्या सर्वांनी मिळून जवळपास सारखेच निष्कर्ष काढलेत. त्यात एकंदरीत मानसिक गुलामगिरी, संसाराच्या जोखाडात अडकलेली स्त्री, पतीच्या स्वामित्वातली एक वस्तू, मुलांसाठी स्वतःचा सगळं सोडून (त्याग करून) जीवनात जगणं वगैरे नेहमीच असतात. त्याचं गांभीर्य निश्चित कमी नाही पण ते स्त्री देहात स्त्रवणाऱ्या संप्रदाकांना पूरकच असतात अस देखील वाटत. बहुतेक फार लांब काळ त्याच व तशाच ठेवणीच्या संस्कारातून स्त्री जनुके जणू त्याला नैसर्गिक प्रतिसाद द्यायला लागलेत की काय माहित नाही. 

8. हव्यात नविन गोष्टी पण…

Art as Hobby

नवीन गोष्टींकडे जो न शिकण्याचा आमचा कल असतो त्याच कारण म्हणजे नाविण्य त्याच्यासोबत काही चुकांचा संच घेऊन येत असतो. त्या शिकण्याच्या प्रक्रियेत होणाऱ्या चुका नैसर्गिकपणे स्वीकारल्या जाव्यात असं अपेक्षित असत पण तसं होताना मात्र दिसत नाही. आमच्या हातून झालेल्या त्या चुकांना इतका चिडवलं जात की त्यातून नकळतपणे आमचाच आम्हाला कमीपणा वाटायला लागतो, तर कधी सरळसोटपणे अपमान केला जातो, कधी आम्ही कसे वेंधळे आहोत हे सांगितल जात, तर कधी अपराधीपण त्यातून लादल जात. त्यामुळे जो आत्मविश्वास नाविन्य स्वीकारण्यासाठी लागतो तोच आमच्यात कधी येत नाही. हा फरक भारतीय स्त्रियां आणि पाश्चिमात्य स्त्रियांमध्ये स्पष्ट दिसेल तुला. त्यांच्या अंगी असलेल्या आत्मविश्वास आमच्याकडे कधीच नसतो कारण तो आत्मविश्वास ज्या स्त्रोतातून( घरच्या पुरुषाकडून कधी वडील, कधी भाऊ तर कधी पती) यायला पाहिजे होता तिथेच नकळत आमची मस्करी करून आम्हाला एक विनोदी पात्र बनवल जाते. आमच्या आत्मविश्वासाला पहिला तडा जातो तो इथे. 

9. निरोपाचे शब्द 

माझ्या जीवनात इतका निरसपणा देखील नाही, मौजेच्या चार गोष्टी कमी असतील पण साधेपणा म्हणजे प्रत्येक वेळेला कंटाळवाणेपणा किंवा रटाळ असाच होऊन जात नाही. खूप लांब काळासाठी माझं रोज एकसारख वेळापत्रक असल्यामुळे थोडासा एक जीनसीपणा आला आहे जीवनात म्हणून मला चित्रपटाला जाण्यापेक्षा छोट्या-छोट्या सहलीला जायला आवडतं. जीवनात कितीही तोच-तोचपणा आला तरी तुझ्या मावशीचा एक फोन आल्याबरोबर माझा सगळा मूड फ्रेश होऊन जातो(तसा तिच्या फोनने तुझे पप्पापण खूश होतात, हे वेगळ सांगायची गरज नक्कीच नाही.) पत्राचा हा असा शेवट पण मास्तरही गालातल्यागालात हसतो की काय, माहित नाही?

का ह्या वस्तू तुमच्या नजरेखालून जाव्यात? 

नेहमीप्रमाणे, kutumbwarta.comच्या प्रत्येक ब्लॉगच्या शेवटी, आम्ही ब्लॉगच्या विषयाशी सुसंगत असा एखादा उत्पादन सुचवतो, जो जीवन सुधारण्यासाठी सहाय्यक ठरतो. या ब्लॉगसाठी आमची शिफारस आहे ,अकरा गिफ्ट आयडिया, ज्यासाठी मुलांसाठी एकदम योग्य आहेत. अशा प्रकारे, आई आणि मुलांमधील संवाद अधिक प्रभावी आणि समजूतदार होऊ शकतो. 

जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल की का ह्या वस्तू तुमच्या नजरेखालून जाव्यात? , तर त्याचे तपशीलवार पुनरावलोकन आमच्या भागीदार साइट awareandbeware.comवर उपलब्ध आहे. हे पुनरावलोकन उत्पादनाच्या वैशिष्ट्ये, फायदे, आणि शक्य तितके तोटे यावर प्रकाश टाकते, ज्यामुळे तुम्हाला योग्य निर्णय घेण्यात मदत होईल. उत्पादनाचा अधिक चांगला उपयोग कसा होऊ शकतो हे जाणून घेण्यासाठी आम्ही तुम्हाला पूर्ण पुनरावलोकन वाचण्याची शिफारस करतो.

आनंद पसरवा

Leave a Comment