बाबांच मुलीला पत्र

(मुलीनं वडिलांना लिहिलेले पत्र वडिलांनी वाचलं आणि त्यावर प्रतिक्रिया म्हणून लिहिलेले पत्र. मुलांनी केलेली कल्पना आहे) 

बाबांच पत्र

1. गोड नात्यात मर्यादा फार

father with his daughter

आपल्या नात्यातील प्रेमाचा आणि राखलेला अंतराचा जो पेच आहे तो फक्त तुझ्या मनालाच नव्हे तर माझ्या मनाला देखील सोडवता आला नाही. ह्या पेचाची सुरुवात बहुधा मुलगी वयात येण्यापासून होते. हे औपचारिक अनौपचारिकाची सुरुवात नैसर्गिक उर्मीतून झालेली आहे की समाजान लादुन केलेली आहे माहीत नाही. पण त्याला इतका सहजभाव आलाय की प्रत्येक घरातील वातावरण जवळपास सारखंच दिसतय.

2. तीच परिस्थिती माझी पण

आतापर्यंत आपल्या संवादाची बरीच देवाण घेवाण तुझ्या आईमार्फत झाली हे मान्य आहे मला. तुझ्या सोबत थेट संवादाची संधी ह्या पत्रमार्फत मिळाल्यावर तुला कल्पना करण्याचा देखील जसा अडचणी आल्या त्याहून जास्त मला येत आहेत कारण मुलीशी बोलताना, कसं बोलायचं हे आम्हा वडिलांना फारसं कोणी शिकवल नाही. 

3. वेगळा विचार 

कुटुंब चालवायला पुरुषांकडे पैसा, क्षमता आणि धाडसीपणा लागतो. तसाच आत्मविश्वास सुद्धा लागतो. स्वतःच्या चुका जर आम्ही पुरुष स्वतःच काढायला लागलो तर आत्मविश्वासाला तडा जाण्याची भीती नेहमीच असते. स्वतःच्या चुका काढून, स्वतःला अधिक अचूक व योग्य बनवता येत, हे मला मान्य आहे. पण स्वतःच्या चुकांची मालिका तपासून त्यात आत्मविश्वासाची कमी होऊ न देणं ही कला जशी फारश्या पुरुषांकडे अजूनही विकसित झालेली नाही तसेच ती माझ्यातही विकसित झालेली नाही. स्वतःच्या विचारांपेक्षा वेगळा विचार पचवता येत नाही आम्हा जुन्या लोकांना असच वाटत असतं तुम्हाला, ते चुकीचे नाही म्हणा. पण आम्ही आमच्या अनुभवाच्या आधारावर परिस्थितीचा अर्थ लावत असतो. जो प्रत्येक वेळेस जरी बरोबर नसला तरी बहुतेक वेळेस असतोच.

4. बाप तो बापच

father with his daughter

 मुलीचा बाप होण तशी अभिमानाची गोष्ट असते पण असुरक्षित वातावरणात जीवाची हुरहुर वाढतेच. पण त्यात मला फार काही नकारात्मक वाटत नाही. वडिलांची भूमिकाच असते जबाबदारीची, जोखीमची नि स्वतःला खर्ची पाडून घेण्याची. मग बाप मुलीचा झाला काय नी मुलाचा झाला काय ? छोटासा फरक पडतो तो जबाबदारी आणि जोकमांच्या स्वरूपाचा मुलांच्या संगोपणात जीवाची हुरहुर लागते ती त्याच्या व्यसनाने, निर्धाढावलेपणाने व गोष्टीचं गांभीर्य वेळेत लक्षात न आल्याने. त्यामुळे मला वैयक्तिक असंच वाटतं की मुलीचा असो की मुलाचा बाप होउन समान भूमिका निघावणे महत्त्वाच.

5. चर्चा नव्या मुद्द्यावर 

मुली सोबत चर्चचे विषय काही प्रमाणात कमी असतात. मुलींच्या जन्मानंतर त्या सारीपाटाच्या खेळातून हळूहळू काळजी वाहू व्यक्तीमध्ये बदलतात आणि कधी मोठ्या कधी होतात याचा पत्ताच लागत नाही. मुलांसोबत टीव्हीवर बातम्या पाहताना किंवा गाडी चालवताना चर्चची सुरवात होते. ज्या घरात मुली व वडीलांचा चर्चेचा विषय पैसा आणि राजकारण असत ते घर पाॅवर सिम्बॉल नक्की असत. तर आपण कधी करायची बाळा सुरुवात अश्या संवादाची. 

6. मितभाषी पुरूष 

पुरुषांचे समीकरण स्त्रियांपेक्षा काही प्रमाणात वेगळे असतात. कामाचं तेवढच आटोपशीर बोलून काम उरकण्याकडे असलेल्या कल हा पुरुषांकडे त्यांचा मूळचा म्हणावा असा गुण असतो. बाकी अपमान सहन करण, हजारजबाबी नसणं, सुडायची भावना येनं ह्या गोष्टी अंगी असतातच म्हणा आमच्या. पण पुरुषांचा कमकुवतपणा त्यांना जोडला गेल्याने पुरुष मंडळी त्यापासून थोडीशी तरी हटकूनच असते. तसही पुरुषांना घराबाहेर स्त्रियांच्या तुलनेत जास्त अपमान सहन करावा लागतो, त्यातही आणखी भर नको म्हणून आम्ही ते सगळं टाळतच असतो. त्यातून जन्म होतो आमच्या मितभाषी स्वभावाचा. पर्यायान तेही एक प्रमुख कारण असतं आपल्या कमी चर्चा असण्याच. 

7. सहजपणाचे धोके

अपमान आणि अपयश हेच पचवत एक पुरुष उभा असतो. ते मनाला लावून घेण्याचे एकमेव कारण म्हणजे त्या गोष्टी जर वारंवार होत राहिल्या तर तो पुरुष इतर पुरुषांच्या नजरेत एक खेळण बनून राहण्याचा धोका असतो. अशा पुरुषांना कमकुवत असल्याचा शिक्का मारला जातो. एकदा का असा शिक्का पडला, की त्याच्या जीवनातील संघर्ष कित्येक पटीने वाढतो. त्याची झळ फक्त त्यालाच नाही तर त्याच्या कुटुंबाला पण बसते. सामाजिक जीवनात कणखर बनून वागावे लागत, तर आपली किम्मत टिकून असते. पण एकदा का कणखरपणा गेला तर फालतू लोकं पण टपली मारून जातात. ते होऊ द्यायचं नसतं म्हणून हे सगळं दडपण स्वीकारत असतात नेहमी पुरुषं.

8. नैसर्गिक उर्मी

हो हे खर आहे की पुरुषांना अधिकार गाजवायला आवडतं. त्या अधिकारवाणीतून जमेल तितका नियंत्रण प्रस्थापित करण्याचा जवळपास प्रत्येक पुरुषांची धाव असते. ती अधिकार गाजवायची भूक कामाच्या ठिकाणी पूर्ण होत असली (जर कामाचं स्वरूप व त्या कामात असलेलं आमचं पद जर ह्या सगळ्या गोष्टींना परवानगी देत असेल) तर घर तितकं नियंत्रण ठेवायची गरज वाटत नाही. निरोगी मानसिकतेला लागणाऱ्या गोष्टींमध्ये दुसऱ्यांना इतरांना स्वातंत्र्य देण्या इतका प्रगल्भ विचार आम्ही आयुष्याच्या शेवटी वगैरे करतो. तेव्हा आम्ही शांतपणे बघतो की मुलं नातवांना नियंत्रणात ठेवायचा प्रयत्न करत असतात आणि तेही तेच कारण देत असतात, जे आम्ही दिलेली असतात. (कारण क्रमांक 1. हे तुमच्या भल्यासाठी आहे 

कारण क्रमांक 2.  मुलांना चांगल्या सवयी लावायच्या आहेत 

कारण क्रमांक 3. मुलांना काय कळतं, काय वाईट नि काय चांगल ते.

कारण क्रमांक 4. पालकांचे कर्तव्यच आहे हे 

9. अपेक्षा अगदीच माफक

mother with daughter

अपेक्षा सुनेकडून आणि मुलीकडून दोघीकडून सारख्याच आहेत. त्यात आमच्यासाठी काही करावं किंवा आम्हाला त्याचा फायदा व्हावा, इतकापण कोता विचार त्या मागे नसतो. दोघींनीही समंजसपणाने आपापला संसार चालवावेत आणि सर्वात महत्त्वाचं तुम्ही दोघींनी एकमेकांना समजून घ्यावं, ऐवढीच इच्छा आहे आमची. माझ्या नियमाने चालायची आता गरज नाही, जे सर्वार्थाने सर्वांसाठी योग्य ठरते त्या मार्गाने पुढे जा. महत्त्वाची गोष्ट पद्धतशीरपणे मार्गी लावणं महत्वाच नंतर स्वयंपाक वगैरे सारखे गोष्टी होतात नीट.

10. संतुलित विचार 

मानवी मेंदूतून निघणाऱ्या विचारांच्या प्रवाहाची दिशा आता या वयात बदलणं जवळपास अशक्यच, पण काही प्रयत्न केलेत मी सुरू. जे विचार डोक्यात येतात त्यावर लगेच प्रतिक्रिया न देता थोडा वेळ विचार करायचा आणि आलेला विचार जर योग्य दिशेला जाणारा नसला तर तिथेच सोडायचा (तुमच्या भाषेत बहुदा याला सेल्फ अवेरनेस म्हणतात). घरच्या कर्त्या पुरुषाच्या मनात सुरू होणाऱ्या नकारात्मक विचारांची जी मालिका डोक्यात सुरू होते ती फक्त खुळचट कल्पना नसते तर वास्तविक जीवनाचा तो भयानक चेहरा असतो. जो कुठलाही पुरुष स्वतःच्या कुटुंबापासून लांब ठेवायचा प्रयत्न करतो. आम्ही पाहिलेले असतात ते भयंकर प्रसंग जे समाजाच्या कुठल्यातरी भागात सतत घडत असतात. त्या भितीतून होत असते नकारात्मक विचारांची साखळी सुरू  आमच्या डोक्यात.

11. नवी सुरुवात 

फिरायला जायला आवडेल मलाही. आता अंगात उत्साह बेताचा उरलाय. हल्ली वेळ भरपूर असतो पण इच्छा फार काही होत नाही. तरीही तू सुचवल्याप्रमाणे शेजारच्या गावात गणपती मंदिरातून नव्याने फिरण्याचा श्री गणेशा करीनच. फक्त फिरायला जायचं एवढंच सांगितल्यावर देखील तुझ्या आईला होणारा आनंद लपवता येत नाही बघ. वाढत्या वयाला थांबावायचं हे फिरायला जाणं रसायन तस बरं आहे. 

12. अद्भुत कलाक्षेत्र 

art exhibition

कला विश्वात रस घेत नाही असं नाही पण मला त्यात फारस काही कळत नाही. एकदा पेंटिंग बघायला गेलो त्या एक्जीबिशनमध्ये, तिथ येणारी लोक काय काय अर्थ काढयचे त्या पेंटिंग्स पाहून मला तर त्यातल्या निम्म्याहून अधिक पेंटिंग तुझ्या प्राथमिक शाळेच्या चित्रकलेतल्या वहीतील चित्रांसारख्या वाटत होत्या. मला मात्र तेव्हाच कळल की हा प्रांत आपला नाही. संगीतची आवड आणि समज दोन्ही रेडिओवरून सुरू होऊन टीव्हीवर समाप्त होते. त्यातही हल्ली मोबाईल आलेत आणि त्या वाजणारे अश्लील बोल असलेले गाणे त्याचाच काय तेवढा तिटकारा. बाकी सगळं मजेत. कलेचा आसमंत माझ्यासाठी फक्त चित्र आणि संगीत ह्या दोनच ताऱ्यामध्ये संपतो. कारण कला, क्रीडा, साहित्य यात रस घेण्यासाठी रोजच्या गरजा संपण आवश्यक आहे, परिस्थितीने मला रोजच्या गरजेतूनच मोकळा वेळ कधी मिळू दिला नाही पण आता ठरवलय जमेल तेवढ्या गोष्टी करायच्या. आणि या आयुष्यात उरलेल्या गोष्टीची बकेट लिस्ट पुढल्या जन्मात पूर्ण करायची.

का ह्या वस्तू तुमच्या नजरेखालून जाव्यात? 

जस की kutumbwarta.comच्या प्रत्येक ब्लॉगच्या शेवटी आम्ही एक उत्पादन सुचवतो जे ब्लॉगच्या विषयाशी जुळतं आणि जीवनाच्या सुधारणा करण्यास मदत करतं, त्याप्रमाणे यावेळी आम्ही सुचवलेलं उत्पादन आहे 11 Best and Unique Gift Ideas for Daughter. या गिफ्ट आयडिया विशेषतः त्या वडिलांसाठी आहेत जे आपल्या मुलीला प्रेमाने, काळजीने आणि विचारपूर्वक काही खास भेट देऊ इच्छितात. आपल्या मुलीला दिली जाणारी भेट एक सुंदर संदेश देऊ शकते, खासकरून त्या पत्रातील गहिर्या संवादाच्या दृष्टीने, ज्यात वडिलांनी आपल्या मुलीला न विचारलेले प्रश्न उचलले आहेत. हे गिफ्ट आयडिया मुलीला भावनिक, मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या वृद्धी करण्याच्या दृष्टीने योग्य असतील.

तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की हे उत्पादन का तुमच्या लक्षात घेतलं पाहिजे? तर या उत्पादनाच्या सर्व तपशीलांसाठी, तुम्ही आमच्या पार्टनर साइट awareandbeware.comवर विस्तृत समीक्षा वाचू शकता. या पुनरावलोकनात उत्पादनाच्या वैशिष्ट्यांचा, फायद्यांचा आणि संभाव्य तोट्यांचा सखोल विचार केला आहे, ज्यामुळे तुम्हाला एक पूर्णपणे सूचित निर्णय घेता येईल. तुम्हाला अधिक समजून घेण्यासाठी पूर्णपणे पुनरावलोकन वाचण्याची शिफारस केली जाते, ज्यामुळे तुम्हाला कळेल की हे उत्पादन तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी योग्य आहे का.

आनंद पसरवा

Leave a Comment