(वर्गातील मुलांनी आई ही एक सर्वसामान्य मराठी कुटुंबातील आहे व ती एक गृहिणी आहे अशी कल्पना करून पत्र लिहिलं आहे)
खरंतर या पत्रात फार काही लिहिण्यासारखं हाताला लागणार नाही कारण बऱ्याच गोष्टी आपण ऐरवी बोलतच असतो. या नात्यात किमान चर्चेपुरत्या तरी मर्यादा निश्चित कमी आहेत. ज्या गोष्टी आपण समोरच्या समोर बसून बोलू शकत नाही, त्या गोष्टी जर या पत्रात जशाच्या तशा मांडल्या गेल्यात तर आमचे हे मास्तर मला त्यांच्यासमोर कधीच बसू देणार नाहीत. हीच गोष्ट आमच्या ह्या मास्तरांना लक्षात कशी आली नाही अजून.
मुलांच पत्र
1. भोळी माता
मला असं नेहमी वाटतं की तुला सगळं कळतं पण तू जाणीवपूर्वक ते सगळं बाजूला सारून दुर्लक्ष करतेस. तू नेहमी साधी भोळी असल्याचं दाखवतेस. मला खरंच कळत नाही की तू खरच इतकी निरागस आहेस की मलाच तसं वाटतं. ताईला तू कधीच तितकीशी निरागस किंवा साधी वाटत नाहीस. वाटत असलीस तर थोडी शहाणी वाटतेस, तिच्या बोलण्यातला तिरकसपणा जाणवतो मला. बाबांना तर तू कधी साधी वाटतेस, तर कधी भोळी, तर कधी दुधखुळी. मला तर अजूनही कळत नाही, की तू नेमकी आहेस तरी कशी.
2. छुपा रुस्तम
मोठ्या दादाचं लग्न झालं त्यानंतर वहिनीसाठी निरागस, प्रेमळ व्हायचा प्रयत्न तू केलास त्याचा अनुभव आहे मला. पण लग्नानंतर ताईच्या आणि तुझ्या छुप्प्या गप्पांमध्ये मला बऱ्याचदा तुझ्या परिस्थितीच विश्लेषण करायची असलेल्या क्षमतेची जाणीव झाली. त्यापूर्वी मला नेहमीच असं वाटायचं की तुला फार काही कळत नाही. पण आता वाटतं की तुला फारच थोड्या गोष्टी कळत नाही, बाकी बहुतेक गोष्टी तुला चांगल्याच समजतात.
3. नीरक्षीरविवेकी बाई
नातेवाईकांमधील प्रेमाचा धागा तु जपतेस त्याबद्दल शंका नाही. पण ज्या पद्धतीने तु नात्यात गोवलेल सुडाच राजकारण ओळखतेस त्यांला तोड नाही. मी तुला कधी समोर बोललो नाही पण आज मनापासून वाटतंय की बाबांच्या नात्याबद्दल असलेल्या आकलनापेक्षा तुझं आकलन चांगल आहे. त्यांचं एकच असतं एक तर फक्त प्रेम किंवा फक्तच राग. तुला मात्र प्रेमाचा धागा कोणता आणि षडयंत्राचा कोणता हे पटकन ओळखता येत. नात्यातली ही गुंतागुंत तर तुझ्यामुळेच मला समजायला सुरुवात झाली.
4. राजकारण
पण घरातल्या राजकारणाची जशी तुला समज आहे, तशी मात्र राज्याच्या किंवा केंद्राच्या राजकारणातची समज तुला नाही अस मला वाटतं. राजकारण हा विषय तुला समजण्यासारखा असेल तर आपण घराबाहेरच राजकारण समजून घ्यायला काय हरकत आहे. माझं अस वयक्तिक मत आहे की राज्य चालवणार राजकारण हे घरात चालणाऱ्या राजकारणापेक्षा सोप असते.
5. परंपरा, रिवाज नि रीती व त्यांची भीती
विज्ञानाच्या बाबतीत स्त्रियांना नेमकं काय होत ते तर माझ्या आकलना पलीकडच आहे. परंपरेच्या नावाखाली चाललेली किंवा चालवली जाणारी अंधश्रद्धा, अमुक गोष्ट अमुक पद्धतीने, हे असं करायचं असतं, ते तसं करायचं असतं असा साचेबंदपणा असतो. त्यातल्या जवळपास बहुतांश गोष्टीचे कारण माहीत नसताना देखील त्या जशाच्या तशा पाळल्या जातात. मला वाटतं कि ते सगळ तुझं काय ते तू पहा, पण आमच्या कपाळी ते मारू नकोस. ज्यांची कारण माहित आहेत त्या गोष्टी मात्र तडजोडीने केल्या तरी चालतात तुम्हाला पण ज्यांची कारण गुलदस्तात असतात त्याच नेमक्या कठोरपणे कुठल्याही तडजोडी शिवाय करता. आम्ही त्यातल्या बर्याच गोष्टी तुझं मन राखावं म्हणून करतोय. मला वाटतं जमेल तर त्या गोष्टी बंद कर (किमान आता तरी बंद कर).
6. महत्व कशाला?
शेजारच्या घरची, नातेवाईकांची पण इतकीच काय तर टेलिव्हिजनच्या मालिकांतील घरातल्या गोष्टींची योग्यत्या सगळ्या गोष्टीं व बातम्या माहित असतात तुला. पण योग्य बातम्या देणाऱ्या चांगल्या दर्जाच्या वृत्तपत्र कटाक्षान वाचायचं टाळतेस. वाचण्याच्या बाबतीत ना तु एक वृत्तपत्र वाचत, ना एखाद नवीन पुस्तक. पुस्तक न वाचल्यानं त्यात दिलेल्या कितीतरी गोष्टी आपल्या जवळ असून सुद्धा उपयोगात आणता येत नाहीत आपल्याला.
7. प्राधान्यक्रम
तु नव्याने शिकलेला तो तुझा स्मार्टफोन, तसा बाबांनी वापरलेलाच मिळाला म्हणा तुला. पण त्याला योग्य रित्या कसं चालवाच, हे नाही समजलं बाई तुला अजून. अगं काय ते पूजेच साहित्याचे, ब्लाउजच्या डिजाइनचे व्हिडिओज युट्यूबवर बघतेस. त्याहून कितीतरी समंजस व अभ्यास करून बनवलेली व्हिडिओज असतात तिथे. त्यालाही दे कधीतरी संधी. सकाळ संध्याकाळ फक्त आरती वाजवून त्या बिचार्या अल्गोरीदमलाही दुसर काही सुचवता येत नाही बघ. बर युट्यूब राहू देत एक वेळ, पण व्हाट्सअप सांभाळ. अगं काय ते स्टेटस नि काय ते फॉरवर्ड त्यावर येणारी जवळपास निम्मी माहिती खरी नसते बाई, कसले केस दाट करण्याचे नुस्के आणि ते चेहरा चमकवण्याचे लेप बघतेस. हे रोज सांगून देखील आज मी या पत्रात लिहितोय याच कारण स्पष्ट आहे, तू माझं याबाबत अजुनही ऐकत नाहीस म्हणून तीच गोष्ट लिखित स्वरूपात वाचलीस तर यावर विश्वास बसेल.
8. फॅमिली टाईम
कधीतरी आमच्या सोबत बसून एखादा चित्रपट पाहात जा गं. मागच्या वेळेला एक चित्रपट बघितलास त्यातली कथा कुठे जात होती आणि तू त्या अभिनेत्री सारखी साडी पाहिजे म्हणून बाबांना विचारत होती, बाबा मला नजरेने सांगत होते झाली तुझी इच्छा पूर्ण सोबत सिनेमा बघायची. मग कधी कधी त्या अभिनेत्रीला बघून तुझ्या कॉलेजला मैत्रिणीची आठवण यायची तुला. मग पुढचे दहा मिनिट आम्ही सगळे त्या सिनेमाला थांबवून तुझ्या आठवणीचे किस्से ऐकलेत तरी मला वाटतं की आपण सोबत सिनेमा पाहायला पाहिजे. किमान तुझ्या आवडीनिवडीचे टॉपिक तू शेअर करतेस त्या निमित्ताने.
9. स्त्री व समाज
समाज कुठलाही असू दे स्त्रियांच्या दुय्यम स्थान हे ठरलेलच असत. त्यातून ज्या स्त्रीया घडविल्या जातात त्या बऱ्याच एक जिनसी असतात. काटेकोर मर्यादा, संस्कार(वैगरे), हसणे, बोलणे, वागण्याचे सोपस्कार करून लग्नाला उभ्या केल्या जातात. त्यातून निर्माण होते ती एकसाची स्त्रियांची फौज. त्यांना बंधनात राहणंच सर्वस वाटायला लागत. प्रश्न न विचारता, विचार न करता लादले गेलेले काम तेवढ करायच. हेच मनावर बिंबवल गेलय त्यांच्या.
10. नियमांची माळ
स्त्री मनाला पडणारे स्वप्नही आता त्या बंधनांना साजेशे असतात. आपलं एक छोटसं घर असाव, एक छोटसं कुटुंब असाव या पलीकडे फार काही नसतेच म्हणा त्यात. खरंतर त्यात काही गैर नाही किंवा कमीपणा वाटून घ्याव असही नाही. पण नव्या रंगाची, नव्या वळण्याची, नव्या उमेदीची स्वप्न पाहायला काय हरकत आहे. स्वतःला थोडा वेळ देऊन आपल्याविषयी आपल्याला आवडेल ते करायला काय हरकत आहे? नको ती झालेली मानसिक घुसमट काढायची असते ग. का कायमच स्वतःला कौटुंबिक जबाबदारीच्या जोखाडात इतकं स्वतःला अडकवून घ्यायचं की स्वतःलाच विसरून जायचं.
11. नाविण्याच स्वागत
नवीन गोष्टी शिकायला खूप हुशारची गरज नसते ग. लागते फक्त थोडीशी हिंमत. एकदा करून तर बघ, कितीतरी गोष्टी आहेत करण्यासारख्या, बघण्यासारख्या, त्यांना आपल्या कवेत घेण सहज शक्य आहे. मग का घाबरत राहायचं? का मागे राहायचं? संसाराची आर्थिक घडी सांभाळत फक्त बचत व काटकसरीपणा एवढाच काय ते शिकलो आपण आणि तेच करत आलो. पैश्यांबाबतच्या गुंतवणुकीबद्दल समजून घेण्यासाठी का कधी स्वतःहून पुढाकार घेतला नाहीस. थोडा प्रयत्न केला असता तर सहज समजू शकली असतेस ते सगळ.
12. पहिल पाऊल उचला आता
फक्त राहून गेलेल्या गोष्टीबद्दल खंत व्यक्त करायची नव्हती मला या पत्रात. ह्या गोष्टी मी समोरही सांगू शकलो असतो पण मला नेहमी वाटतं की तू आम्हाला वाढवता वाढवता कशी मागे राहून गेलीस हे जर आमच्या तोंडून ऐकशील तर दुखावली जाशील म्हणून समोर न बोलता हे पत्र लिहून सांगायचा प्रयत्न करून बघितला. तुझ्या आयुष्यात साध्या वाटणाऱ्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी सहजपणे दूर राहिल्यात अजून देखील संधी आहे. एक छोटासा प्रयत्न कर किमान आहोत त्यापेक्षा थोडा पुढे जाण्याचा, जीवनात नवा रंग भरण्याचा, रटाळपणा आणि तोच तोच पणा घालवण्याचा. मला विश्वास आहे की तू उचललेलं बदलाच एक छोट पाऊल तुला कधीही न पाहिलेल्या विश्वाचं एक सुंदर रूप दाखवेल.
का ह्या वस्तू तुमच्या नजरेखालून जाव्यात?
प्रत्येक वेळेसारखेच, kutumbwarta.com च्या या ब्लॉगच्या शेवटी आम्ही अशी उत्पादने सुचवली आहेत, जी ब्लॉगच्या विषयाशी सुसंगत असून जीवन सुधारण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. या ब्लॉगसाठी आमच्या शिफारशी आहेत: Creative Potential Within Us All हे टॉम केली आणि डेविड केली यांचे प्रेरणादायक पुस्तक आणि मोबाइल होल्डर. हे पुस्तक आपल्या विचारशक्तीला चालना देण्यासाठी उपयुक्त आहे, तर मोबाइल होल्डर संवाद साधताना हात मोकळा ठेवण्यासाठी आणि सोयीसाठी मदत करतो.
जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल की का ह्या वस्तू तुमच्या नजरेखालून जाव्यात, तर आमच्या पार्टनर साइट awareandbeware.com वरील सविस्तर आढावा तुमच्या जिज्ञासेची पूर्तता करेल. या पुनरावलोकनात उत्पादनाची वैशिष्ट्ये, फायदे आणि मर्यादा यावर सखोल चर्चा आहे, ज्यामुळे तुम्हाला माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत होईल. हे उत्पादन तुमच्यासाठी योग्य का आहे, याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी तुम्ही ही सविस्तर समीक्षा नक्की वाचा.