संकल्पना
पैशाचं नियोजन आणि त्याची भविष्यातील अपेक्षित गरजांची व आवश्यकतेची असलेली जाण म्हणजे आर्थिक साक्षरता. ही आर्थिक आर्थिक साक्षरतेची ढोबळपणे स्वीकारली जाणारी व्याख्या.
कुटुंबात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सत्तांतर होत असताना आर्थिक बाबतीतली समंजसपणा व आर्थिक साक्षरता या मुद्द्याच्या आकलनातील फरक हा साधारणतः दोन्ही पिढ्यांमध्ये खटकणारा विषय.
पैशाच्या बाबतीत नव्या पिढीचे नियोजन कमालीच ढिसाळ आहे असं एकमेव मत असणारे पालक एकीकडे तर पैशाच्या बाबतीत फक्त ‘वाचवा’ एवढ्या एकमेव सूत्रा पलीकडे ह्यांना(पालकांना) काहीही माहित नाही म्हणून सांगणारी मुलं दुसरीकडे.
दोन्ही पिढींचे पैशाचे अनुभव, अपेक्षा व परिस्थितीनुसार गरजेची तीव्रता पूर्णपणे वेगळी असल्याने आर्थिक साक्षरता या विषयाचे आकलन वेगवेगळे असणं नैसर्गिकच.
आर्थिक साक्षरता म्हणजे काय व त्याचा योग्य(बर्याचदा एकमेव) अर्थ काय? ह्या प्रश्नाच उत्तर दोन्ही पक्षानी आपापल्या सोयीचे काढून ठेवलेले असतात.
एवढेच नव्हे तर त्यानुसार त्यांच वागणं देखील सुरू झालेल असत. दोन पिढीतील खटके उडण्यामागे हे कारणं देखील मोठे हातभार लावत असतात.
हा फरक समजून घेताना एक गोष्ट कटाक्षाने लक्षात ठेवावी लागते, साधारणतः कुटुंबात कुठल्याही गोष्टीत फरक किंवा तफावत नजरेत आल्यावर पहिला प्रश्न पडतो, ‘नेमकं बरोबर कोण?’
तपशीलात जाऊया
‘नेमकं बरोबर कोण?’
आणि या प्रश्नाचे उत्तर आपल्या बाजूने व आपल्या सोयीने स्वीकारल जावं यासाठी दोन्ही पिढ्या पूर्ण ताकदीने तर्कांची बरसात करायला लागतात आणि नेमकी याच ठिकाणी विकेट जाते कुटुंबातील नात्यातील समजूतदारीची
लगेच उत्तराचा शोध घेण्यापेक्षा त्याआधी प्रश्न एकदा तपासायला हव की तो प्रश्न योग्य आहे का ? त्याची दिशा व मिळणार उत्तर कुटुंबाला सकस व पोषक असणार आहे का? आणि नंतर उत्तराचा शोधत निघायला हवं.
या तर्कावर जर ‘नेमकं बरोबर कोण?’ या प्रश्नाला घासल तर या प्रश्नात असलेली अंतर्भूत नकारात्मकता सहज लक्षात येईल. नेमकं कोण बरोबर या प्रश्नाच्या उत्तरातच नेमकं कोणी एक बरोबर असणार तर दुसऱ्याला चुकीचे ठरवलं जाईल. कारण प्रश्नाची मागणीच तशी आहे. आणि अखंड मानव जातीच्या मतानुसार चुकीच्या पक्षावर तमाम दोष घातले जातील. बरोबर पक्षाची विजय मिरवणूक घरात निघेल.
आता प्रश्न असा की आपल्याला हे हवंय का आपल्या कुटुंबात, ‘नक्कीच नाही’ हेच काय ते एकमेव उत्तर असणार या प्रश्नांच. मग प्रश्न बदलायला हवा व त्याची दिशा योग्य करावी लागेल. तर नव्याने योग्य प्रश्न तयार केला तर तो काहीसा असा असेल की, ‘नेमकं कोणाला काय समजून घ्यायला लागेल?’ या नव्या स्वरूपातील प्रश्नाला पाहताच प्रथमदर्शनी आपल्या लक्षात येते की या उत्तरात कोणी एक विजेता नसणार आणि सरळ प्रभावाने कोणी एक पराभूत नसणार. दोघांनाही थोडं थोडं ॲडजस्ट करावं लागणार आहे. एकंदरीत सुदृढ कुटुंबाला लागणारं समीकरण (कोणाला स्वतःचा मोठेपणा स्वीकारायची व कोणाला मुकाट्याने लहानपणा स्वीकारायची गरज नाही) यात बरोबर बसलय.
1. आर्थिक साक्षरतेचे दोन आकलन
अ. उजवी बाजू (ज्येष्ठांच आकलन):
-विचारांची उजवी बाजू म्हटली की त्यात टिकाऊपण, फारसा बदल न स्वीकारणे स्वाभाविकरीत्या आलंच. तो गुण आर्थिक साक्षरता या विषयात सुद्धा दिसतो. वडील पिढीनुसार पैशांची दोन(च) उपयोग असतात. मूलभूत गरजांची पूर्तता व निगडीच्या गरजेसाठी सुरक्षित ठेव, या पलीकडे पैसे वापरले तर ते पैसे वाया घालवलेत असाच अर्थ ते काढतात. त्यांच्या(पालकांच्या) पैशाचे बाबतचे विचार, देशाच्या आर्थिक स्थितीच्या गेल्या अर्ध्या शतकाचा आलेखावर एक नजर टाकली तर ते बरोबर आहे हेच लक्षात येत.
-उदाहरणसह स्पष्टीकरणः
स्वतःची बाजू कशी बरोबर आहे हे उदाहरणातून समजावून सांगण्याची पालकांची सवय इथेही लपत नाही. काळजीपोटी पोटच्या गोळ्यावर काळजी करण्याची वेळ येऊ नये म्हणून कित्येकदा ते स्वतःचे विचार उदाहरणातून ठसाचे प्रयत्न करतात. त्यात कोण कसा फसला, कोण कसा अपयशी(बरबाद-संवादाची तीव्रता जास्त असेल तर) झाला अशी घाबरवून टाकणारीच असतात. पण अती काळजी देखील जीव घुसमटवून टाकते याचाच त्यांना विसर पडलेला असतो.
-आमच्या मेहनतीची, त्यागाची नि संघर्षाची किंमतच नाही:
मुलांच्या गरजा संपल्यात कि ते वळतात उच्च गरजांकडे(higher needs) कपडे म्हणजे basic need पण अमुकच brandचे कपडे म्हणजे higher need. त्यात पैसे खर्ची घातले की तो पैसा उधळला गेला अशीच समजूत पालक वर्गाला चटकन होते. किती कष्टाने गं बाई मी आणि ह्यांनी मिळून हे सर्व उभ केलं पण आमच्या ह्या कार्ट्याला आणि त्याच्या बायकोला त्याची मुळीच किंमत नाही, म्हणणारी आई सकाळ-संध्याकाळच्या चहा सोबत तिची तशी ही खदखद गिळत असते. अशा भावना लपतही नाही आणि व्यक्त होत नाहीत. मग टोमण्यारुपात निघतात वेळोवेळी.
आ. डावी बाजू (नव्यांचं आकलन):
-राजकारण असू दे, समाज जीवन किंवा कौटुंबिक जीवना डावी बाजू म्हणजे बदलाची हे निश्चित. बदल स्वीकाराला तसा सोपा असतो, पण तो बदल स्वतःच्या सोयीनुसार आणि स्वतःचा पुढाकाराने केलेला असेल तर. स्वतःच्या मर्जीनुसार इतरांना फरपटत नेला जाणारा बदल असेल तर तो स्वीकारला जात नाही. जीवनातील इतर कुठल्याही निर्णयापेक्षा आर्थिक बाबतीतील निर्णय आत्मकेंद्रित असल्याने ते बदल स्वीकारण्यात अवघड जातात.
-प्राधान्यक्रमात झालेला बदल:
खर्च करण्यात, गुंतवणूक करण्यात व इतर स्त्रोत निर्मिती करण्यात दोन्ही पिढ्यांत कमालीचा बदल झालाय. पैसा वाचवण्यासाठी अतीसुरक्षित गुंतवणुकीच्या मर्यादा दिसू लागल्यानंतर नव्या पिढ्यांनी जोखीम स्वीकारून अधिक परतावा देणाऱ्या पर्यायाची निवड करणे योग्यच, फक्त काळजी असते ती सुरक्षिततेची.
-अति तीव्र निष्कर्ष:
ह्यांना मजा करता आली नाही म्हणून आम्हाला मजा करताना पाहून पोटात कळ येते बाकी काय. तरुणांना असे टोकदार विचार आल्यावर त्याच्याकडून एक तर्क दिला जातो. मुलांचा जन्म हा त्यांच्या वडिलांनंतर होत असतो यात मुलांचा काय दोष? हा तर्क वा निष्कर्ष नसून नैराश्याच लक्षण आहे, जेव्हा जेष्ठ पिढी काहीही करू ऐकत नाही म्हटलं की विचार याच दिशेला वाहतात. त्याचा वास्तविकताशी काही संबंध नसतो.
2. कोणाला काय समजण्याची गरज? –
(कोणी गोपाल घ्या, कुणी गोविंद घ्या)
अ. नव्यांनी:
-नव्या गोष्टी शिकण व बदल स्वीकारणं मेंदूचा जो भाग करत असतो नेमका तोच भाग वयोमानानुसार थकत जातो , त्यामुळे अपेक्षाच करताना किमान पातळीवरच्या कराव्यात. त्याही काही वेळेला पूर्ण होत नाहीत, हेही ज्ञानात ठेवाव.
-आकलन व्यक्ती निरूप होत नसून परिस्थितीत निरूप होत असल्याने त्यांचा वैयक्तिक दोष अजिबात नाही. ज्या परिस्थितीतून ते आले त्या परिस्थितीतून आपण किंवा इतर कोणी आला असता तर त्यांचं आकलन हेच असतं.
-आपल्याला जेष्ठ पिढी जरी खटकत असली तरी बघता बघता आपल्या पायात त्यांच्याच चपला येणार आहे हे विसरून चालणार नाही. आज ते जुने, उद्या आपण जुने हे समीकरण डोक्यात पक्क करून ठेवाव.
आ. जुन्यांनी
-मूलभूत गरजा संपल्या की उच्च गरजांची जागा मूलभूत गरजा घेत असतात. घर बांधण वडिलांसाठी महत्वाच असत इंटेरियर डिजाइनींग हे मुलांसाठी महत्त्वाचं असतं.
-आज मुलं जरी आगाऊ उधळले वाटत असतील तर एक नजर त्यांच्या आजोबाकडे म्हणजे आपल्या वडिलांकडे टाकावी त्यांच्यानजरेत. आपणही काहीसे आगाऊ उधळे आहोतच. हे लक्षात येईल.
-उरलेच किती दिवस, जे चाललंय ते मुकाट्याने सहन करायचं आणि आलेला दिवस ढकलायचा. या विचारापेक्षा येणारा प्रत्येक दिवस नाविण्याचा म्हणून घालवायला हरकत नाही.
का ह्या वस्तू तुमच्या नजरेखालून जाव्यात?
kutumbwarta.comच्या प्रत्येक ब्लॉगमध्ये, आम्ही एक असा उत्पादन सिफारशीत करतो, जो त्या ब्लॉगच्या विषयाशी संबंधित असतो आणि आपल्या जीवनात सुधारणा करण्यासाठी उपयुक्त ठरतो. यासाठी, या ब्लॉगसाठी आम्ही सिफारशीत केलेले दोन उत्पादन आहेत: पहिलं – The Psychology of Money आणि दुसरं – Your Money or Your Life.
The Psychology of Money हे पुस्तक तुम्हाला पैशाशी संबंधित मानसिकता आणि कसा तुमचा आर्थिक निर्णय तुमच्या जीवनावर प्रभाव टाकतो हे समजून घेतल्यावर आपल्या कुटुंबाच्या पैशांच्या व्यवस्थापनाला एक नवा दृषटिकोन देईल. Your Money or Your Life हे पुस्तक एक ठराविक दृषटिकोनात, कुटुंबात उत्पन्नाच्या आणि खर्चाच्या गोष्टींवर विचार करत आर्थिक साक्षरतेला मार्गदर्शन करतं. हे दोन पुस्तकं तुमचं आर्थिक जीवन आणि कुटुंबातील पिढ्यान-पिढ्या बदलत जाणारे आर्थिक सामर्थ्य, त्याचे महत्त्व आणि त्यासोबत येणारी आव्हाने यावर विचार करायला मदत करू शकतात.
तुम्हाला जाणून घ्यायचं असल्यास की हे उत्पादन तुमचं लक्ष का वेधून घेतं, तर तुम्ही आमच्या पार्टनर साइट awareandbeware.com वर याविषयीची सविस्तर समीक्षा वाचू शकता. या रिव्ह्यूमध्ये त्याच्या सर्व वैशिष्ट्ये, फायदे आणि संभाव्य तोटे समाविष्ट केले आहेत, ज्यामुळे तुम्हाला एक सूज्ञ आणि पूर्ण निर्णय घेता येईल. मी तुम्हाला या उत्पादनांच्या सविस्तर पुनरावलोकनाची शिफारस करतो, जे तुम्हाला कळवेल की ते तुमच्या कुटुंबासाठी किती उपयुक्त ठरू शकतात.