मुलांच वडिलांना पत्र 

चला, आज पहिल्यांदाच समोरासमोर बोलण्याचा योग आला, उगीच आईला आपल्या मधला पोस्टमॅन सॉरी पोस्टवुमेन बनवायची गरज नाही. या पत्रात मी तेच बोलणार आहे जे परस्पर बोलता येत नाही, यात मला तुमची काळजी एवढ्यासाठी वाटते की मी ज्या गोष्टी सांगतोय त्या तुम्ही मान्य कराल की नाही माहित नाही. पण त्यामुळे तुम्हाला त्रास होऊ देऊ नका.

a close door

पप्पा, माझ्या तीन गर्लफ्रेंड होऊन गेल्यात, दोन एक्स म्हणजे आधीच्या आणि आताची एक. पहिल्याच ओळीत तुम्हाला वाटलं असेल की बर झालं आपण रोज फार काही संवाद साधत नाही. नाहीतर हे रोज रोज ऐकावं लागलं असतं तेही, आपल्याच चिरंजीवांकडून. गंमत केली हो. तीन गर्लफ्रेंड नाहीत पाच आहेत. मागच्या आठवड्यात तुमची बाईक नाही का सर्विसिंगला नेली होती, तेव्हा ‘तिला’ फिरवून आणलं होतं.

1. वडिलांची राजकारणावर चालणारी चर्चा 

father and son discuss

चर्चेतून उत्तर मिळतात, नव्या दिशा कळतात पण त्यासाठी चर्चा योग्य दिशेने व योग्य मुद्द्यावर होणे आवश्यक आहे. तुमची राजकारणावरची चर्चा म्हणजे झटपट(बर्‍याचदा चुकिची) उत्तर शोधणारीच(निष्कर्ष काढणारीच) असते. प्रश्नाचं विश्लेषण करणारी असण्यापेक्षा वेळ मारून नेणारी असते. तसंही कायच बोलतात चर्चेत तुमचे मित्र सत्ताधारी असे आणि विरोधक ते तसे. अहो पप्पा, राजकारणातील चर्चा ही ‘धोरणकेंद्रित’ असावी लागते तर त्यातून काही निष्कर्ष निघतात. मला माहित आहे एकाही सरकारी धोरणाबद्दल किंवा योजनेबद्दल तुम्हाला फार काही माहिती नाही. पण तुमचा पुरुषीपणा तुम्हाला याची जाणीव देखील होऊ देत नाही.

2. कोण काय म्हणेल? 

gossips between father and son

कोण काय म्हणते याकडे पाहायचं नसतं, त्याकडे जास्त लक्ष द्यायचं नसतं असं तुम्ही म्हणता व लगेच इतरांना जज करत असता. इतर लोक आपल्या मुलांना काही म्हणू नये ही अपेक्षा तेव्हाच पूर्ण होण्याची शक्यता असते जेव्हा आपण इतरांच्या मुलांना काही म्हणत नाही. पण तुमचं मात्र नेहमीच असतं, कोणाच्या मुलाला कोणत्या परिक्षेत कोणी किती मार्क पडले? कोणाला सरकारी नोकरी लागली? कोणाच लव मॅरेज झालं? तुम्हाला काय हो पप्पा करायचं असतं या सगळ्या गोष्टींच. 

3. पैश्यांबाबत

पैशांच्या बाबतीत तर बोलायलाच नको. उधळ्या मराठी बाप तर मराठी मातीत शोधून सापडायचा नाही. त्यामुळे आर्थिक नियोजनाबद्दल ज्ञान देऊन मला माझ्याच अकलेचे तारे तोडायची गरज नाही. पण मला वाटतं आर्थिक नियोजनाचा जो मार्ग तुम्ही निवडला आहे तो इतका tried and tested आहे की FD आणि रियल इस्टेटच्या पलीकडे त्यात काहीच नाही. गुंतवणूकीसाठी हे कालबाह्य वाटणारे ऑप्शन सोडून थोडा आधुनिक पर्याय बघायला हरकत नाही. आज कालची मंडळी शेअर मार्केटचा व्यवस्थित अभ्यास करुन पैसा गुंतवतात व आपल्यापेक्षा कितीतरी पटीने लवकर पैसा वाढवतात. खर तर आर्थिक नियोजनाबद्दल मी या काल्पनिक पत्रात जरी काही सुचवलं तरी ते तुम्ही कल्पनेत देखील करणार नाही याची मला खात्री आहे.

4. कपड्यांची स्टाईल 

new cloths

नव्या पद्धतीने तुम्ही गुंतवणूक करणार नाही हे मला माहीत आहे म्हणून जर मला नविन पध्दतीच काही सुचवायचं असेल तर मी ड्रेसिंग सेन्सवर सुचवेन. किती आउटडेटेड आहे तुमचा ड्रेसिंग सेन्स, जे कपडे ऑफिसला घालून जाता तेच कपडे किंवा त्यासारखेच कपडे लग्न समारंभाला घालून जाता. ही अडचण तर एकंदरीत तुमच्या संपूर्ण पिढीचीच आहे. कुठल्याही कार्यक्रमात मी एका नजरेत सांगू शकतो की कोण शिक्षक, कोण वकील, कोण तुमच्या ऑफिसचे मित्र, कारण त्यांचा ड्रेसिंग पॅटर्न एकच असतो कामाला जातांना आणि कार्यक्रमाला जातांना. फक्त जागा बदलते तुमच्या पिढीतल्या कपड्याची रीत नाही.

5. बदल स्वीकारण्याबाबत

 ज्या वयात तुम्ही आहात त्या वयात बदल स्वीकारणे म्हणजे खरंच कठीण काम. खर तर डोकेदुखीच, ती आणखीनच वाढवली या टेक्नॉलॉजीने, सतत काहीतरी नव्यानेच शिकाव लागत. आर्थिक नियोजनात आपण नाविन्य असलेले शेअर मार्केट दूर ठेवलं ते जोखीम आहे म्हणून, कपडे बदल करायचं नाही कारण ते बालिश आहे म्हणून. खरंतर बदल करायचाच नाही का कशातच आपल्याला, आणि म्हणून त्यासाठीचे एक एक निमित्त शोधतो आपण. थोडसं थांबून विचार केला तर एक गोष्ट सहज लक्षात येईल. ती म्हणजे सगळे बदल ज्या पद्धतीने आपल्या समोर ठेवले जातात ते स्वीकारायला खूपच सोपे असतात किंबहुना ते बदल स्वीकारण्यास सोपे जावेत याच पद्धतीने त्यांना विकसित केले जातात. स्मार्टफोन नाही का तुम्ही शिकलात. व्हाट्सअप सुध्दा शिकलात (त्यावर फक्त एकच सांगायच आहे, मुलांना बोलायला शिकवायला तीन वर्षे लागतात आणि कसं बोलायचं ते शिकायला त्यांच आयुष्य जातं तसच नव्यान व्हाट्सअप चालवायला शिकणाऱ्या म्हाताऱ्यांना एक महिना लागतो आणि कसं चालवू नये हे शिकवायला पूर्ण म्हातारपण जाव लागत). ऑनलाईन पेमेंट शिकलात (घाबरत घाबरत का असेनात) तसच सगळ सोप आहे फक्त विश्वास ठेवा आणि पुढे जा.

आईच ठीक आहे, पारंपरिकता जपण्याची तर तिची मेंटल कंडिशनिंगच तशी झालेली असं समजूया पण तुम्ही का रुढी, परंपरा या सगळ्याचा जोखाडात अडकताय. स्त्रीच्या भावणा प्रधान मनाला लागणारा आधार ती मुर्तीपुजा, उपवास, व्रत इत्यादीपासून घेते. पण ज्यांनी यश अपयश पचवलं, अनिश्चितता झेलली असे व्यक्तीमत्व देखील ह्या गोष्टींचा आधार घेतो म्हटल्यावर या आघाडीवर बदल स्वीकारायची गरज नक्कीच आहे, हे दिसून येते.

6.  ताणतणावाच नियोजन 

ताणतणावाच नियोजन करायला लागणार्‍या सामान्य बाबींचीच बोंब आपल्यात आहे. त्या सामान्य बाबीं पैकी एक म्हणजे आपल्याकडून चूक झाल्यास ती मान्य करणं आणि दुसरी म्हणजे माफी मागून पुढ चालणं.

मजबूत व्यक्तीमत्वाच एक लक्षात म्हणजे चूक मान्य करणं. स्वतःची चूक स्वीकारणे व त्यात सुधारणा करणं. मग आपण पहिल्याच पायरीवर लोळण का घेतो हे मला अजूनही कळलं नाही. आपल्याला का स्वतःवर हसायला त्रास होतो? का झाली चूक तर अपराधीपण आल्यासारख होतं? या सगळ्यांवर एकच उपाय असू शकतो तो म्हणजे एक छोट पाऊल त्या दिशेन उचलन. रोज शतपावली करण्याचा जसा छोटासाच बदल तुम्ही केलात तो तुमच्या तब्येतीसाठी जसा उत्तम तसेच प्रत्येक छोटे बदल या सगळ्यांसाठी एक सुरुवात ठरतील. अनावश्यक खमकेगिरी करू नका आणि जिथे गरज वाटते तिथे मदत मागा, मदत मागायला प्रचंड हिमतीची गरज असते असं म्हणतात. तुमच्या व्यक्तिमत्त्वात हिमतीची कधीही कमी पडणार नाही याची मला जाणीव आहे. कमीपणा स्वीकारणं हे

मोठेपणाचे लक्षण आहे आणि नेमकं तेच आपल्या लक्षात येत नाही. माफी मागणं आम्हाला जड जातं कारण चूक आणि बरोबर ह्या गोष्टी मराठी माणसाच्या (एकूणच भारतीयांच्या) मनात योग्य-अयोग्य अशा न राहता त्या लहान आणि मोठा अशाच असतात, असा गैरसमज करून घेतला जातो, त्यामुळे मोठेपणा मिरवण्यात येणारा अडथळा म्हणजे माफी मागणं किंवा लहानपणा स्वतःवर चुकूनही येऊ नये म्हणून घेतली जाणारी काळजी म्हणजे माफी मागण्याच टाळणं. लहानपणी माफी मागायला सर्वांना शिकवतात मग माणसं मोठी होऊन माफी मागायची नसते असं कधी आणि कुठे शिकवली जात असतील बरं. 

7. काळसुसंगत बदलणारे 

काळ भयानक बदलला म्हणता तुम्ही, मला काय वाटतं काळात झालेला बदल म्हणजे तुम्हाला ज्या गोष्टी करायची इच्छा होती पण करता आल्या नाही त्या सगळ्या गोष्टींची इच्छा आम्हाला या वयात आल्यावर नैसर्गिक रित्याच व्हायला लागली आणि आम्हाला त्या गोष्टी पूर्ण करायची इच्छा पूर्ण करण्यासाठी काही प्रमाणात तरी संधी मिळाली. वेळेनुसार समाजात त्या गोष्टींना अडथळा राहिला नाही किंवा कमी झाला. ओयो हॉटेलबद्दल तुम्हाला नक्की माहित नाही असं होऊ शकत नाही पण मी तिथे गेलो याचा तुम्हाला पत्ता लागणार नाही. गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचे असलेले संबंध समाज म्हणून त्यावर चरित्राचा संबंध जोडतात. ज्या देशात भ्रष्ट राजकारणी चरित्रवाण होऊ शकतो, गुन्हेगार मंत्री होऊ शकतो त्याच ठिकाणी लैंगिक संबंध मात्र चरित्रहीन होतात याच कारण म्हणजे ह्यातून संबंध प्रस्थापित करणाऱ्याला सोडून इतर कोणाला काही हाशिल होत नाही म्हणून चरित्राचा हा असा आपला सोपा आणि आपल्या सोयीप्रमाणे काढलेला अर्थ याला चिपकवला गेला. भ्रष्टाचाराच्या फायदा जसा अनेकांना होतो तसा या संबंधाचा फायदा इतरांना पोहोचत नाही त्यामुळे भ्रष्टाचार चरित्र मुल्यांच्या यादीत शाबुत आहे पण शारीरिक संबंध मात्र या यादीतून हद्दपार केलेत मी गॅरंटी देऊ शकतो याचा फायदा (‘याची मलाई’ हा शब्द जरा जास्तच योग्य रित्या बसला असता आणि त्याचा अनावश्यक किळसवाणा अर्थ निघाला असता) जर इतरांना मिळाला असता तर हे संबंध देखील चरित्रवाण  व्यक्तिचा गुण म्हणून या समाजात मिरवता आला असता. पण हरकत नाही त्या गोष्टींकडे पाहाणारी नजर हळुहळु बदलत चालली आहे. 

8. कळावे, लोभ असावा.

love betwen father and son

कुटुंबासाठी लागणाऱ्या शक्य तीतक्या सगळ्या गोष्टी स्वतःच्या कुवती प्रमाणे तुम्ही केल्यात, तो संघर्ष मी नेहमी लक्षात ठेवीन. त्या मेहनतीची किंमत कधीही वाया जाऊ देणार नाही. आता एवढंच म्हणेन जस कुठल्याही बापाला त्याच्या जीवनात स्वतःच्या मुलांच्या नजरेत हिरो बनायचं असतं तसा तो नेहमीच असतो. शेवटी फक्त एवढच म्हणतो You are my hero. 

का या गोष्टीकडे आपलं लक्ष असावं

kutumbwarta.com च्या प्रत्येक ब्लॉगच्या शेवटी, आम्ही काही उत्पादन सुचवतो जे ब्लॉगच्या विषयाशी सुसंगत आहे आणि तुमच्या जीवनात सुधारणा करण्यास मदत करू शकते. या ब्लॉगसाठी आमची शिफारस आहे लेदर प्रीमियम डायरी आणि स्मार्ट वॉच. दोन्ही उत्पादनं वडिलांसाठी अत्यंत उपयुक्त भेट ठरतात. डायरी, त्यांना आपल्या विचारांचा आणि भावना व्यक्त करण्याचा एक सुंदर मार्ग देईल, तर स्मार्ट वॉच त्यांचं आरोग्य आणि दैनंदिन जीवन अधिक सोयीस्कर करण्यास मदत करेल. ही दोन्ही उत्पादने वडिलांच्या व्यक्तिमत्त्वाला आणखी समृद्ध करतात आणि त्यांना त्यांच्या भावनांचा अधिक सखोलपणे अनुभव घेण्याची संधी देतात.

जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल की हे उत्पादने तुमच्यासाठी योग्य का आहेत, तर आमच्या साथीदार साइट awareandbeware.com वर या उत्पादनांचं संपूर्ण पुनरावलोकन उपलब्ध आहे. हे पुनरावलोकन उत्पादनांच्या वैशिष्ट्यां, फायदे आणि शक्यतो दोषांचा सखोल अभ्यास करते, जे तुम्हाला पूर्णपणे माहिती मिळवून सर्वोत्तम निर्णय घेण्यास मदत करेल. यामुळे तुम्हाला या उत्पादनांची खरी किंमत समजून त्यांचा तुमच्या जीवनात कसा उपयोग होऊ शकतो याबद्दल एक सुसंगत दृष्टीकोन मिळेल.

आनंद पसरवा

Leave a Comment