1. जगावेगळ नातं

आपल्या नात्यातील प्रेम व दुरावा हे एक अनाकलनीय कोड मला कधीच कळलं नाही. जगात अनेक नाती असतात त्यात सख्ख नात असून इतकं अंतर राखणारे बहुदा आपणच. दादा मला सतत जगातील एकमेव औपचारिक असलेल्या सख्ख नातं म्हणून चिडवतो. त्याचंही खरंच आहे म्हणा.
आज पहिल्यांदाच संधी मिळाली आहे असं एकमेकांबरोबर थेट संवादाची. ऐरवी आई मार्फत चालणारा संवाद हा असा जेव्हा सरळ सरळ होत असतो तेव्हा कळतही नाही नेमकी सुरुवात कुठून करायची ते. कारण कळायला लागल्यापासून कधी तसा खुल्या संवादाचा देखील मार्ग असतो ह्याची कल्पना देखील केली नव्हती.
2. पहिली विनंती
आज पत्र लिहिताना सुरुवातीला फक्त इतकंच वाटतंय की जर माझ्या विचारातील एखाद-दुसरा पैलू तुमच्या विचारांना पटला नाही तर लगेच जजमेन्टल होऊ नका. लगेच कुठल्याही निर्णयावर येऊ नका. घरच्या कर्त्या पुरुषाकडे घराने निर्णय घ्यायची जबाबदारी सोपवलेली असते. प्रत्येक पुरुष स्वतःच्या व्यवहारिक ध्यानातून आपल्या कुवतीने घरासाठी व कुटुंबासाठी योग्य तो निर्णय घेत असतो. या प्रक्रियेत हळूहळू कर्ता पुरुष स्वतःचे निर्णय कधी इतरांवर लादायला लागतो ते त्याला देखील कळत नाही. त्याने लावलेला अंदाज किंवा एखाद्या परिस्थितीचा काढलेला अर्थ चुकू शकतो इतका साधा विचार पण त्याला काही वेळा करता येत नाही.
3. जन्म ‘मुली’च्या बापाचा
माझ्या जन्मानेच कितीतरी प्रश्न उभे केले तुमच्या जीवनात. एका मुलीचा बाप होणं ही स्त्री सोबत असलेल्या कुठल्याही इतर नात्यांपेक्षा सर्वाधिक जबाबदारीचा किंवा काही परिस्थितीत जोखमीचच काम. रोज वृत्तपत्रात येणाऱ्या स्त्री अन्यायाबद्दलच्या बातम्यांनी जितकी एका मुलीच्या बापाची काळजी वाढते तितकी कदाचित कुठल्याही व्यक्तीची वाढत नसणार. स्त्री सुरक्षा जीवनाच्या कुठल्याही आघाडीवर असू देत त्याची जी धाप मुलीच्या बापाला बसते ती इतर कोणाच्या लक्षातही येणार नाही कदाचित.
तसतर बाप होणं हेच मुळात जिगरीच काम मुलीचं असू दे किंवा मुलाच. इंटरनेटनेट घडवलेल्या क्रांतीनंतर जनरेशन गॅप वाढल्यामुळे मुक्त विचारांचा वेग वाढला. त्यामुळे आधी समाज जो बदल शतक भरानंतर स्वीकारायचा, पचवायचा तो हल्ली दशकभराच्या आतच पचवला लागलाय. त्या बदलात नातही अपवाद नाहीत. ज्या भूमिका आपल्याकडून वटवल्या जातात त्यात ताकतीची बाजू स्त्रीसोबत नसतेच बहुदा. त्यामुळे कुठलेही आर्थिक किंवा राजकीय बाबीवर चर्चेचा फार काही स्कोप आपल्या नात्यात नाही. कारण पैसा असू देत किंवा राजकारण शेवटी (खरंतर सुरुवातीलाच) त्याचा संबंध येतो ताकतीशी. त्यामुळे पुरुष म्हणून ह्या गोष्टी नेहमी दुसऱ्या पुरुषांशीच चर्चेला जातात पण माझं अनुभव असा आहे की ज्या घरात वडील व मुलगी पैसा आणि राजकारण यावर चर्चा करतात, ते घर खऱ्या अर्थाने समाजात एक ‘पाॅवर सिम्बॉल’ असते. निश्चित असे घर फार कमी असतात.
4. सहजतेचा अभाव

चर्चेचे विषय आपल्या नात्यात फार कमी, त्यातही जवळपास सगळ्याच पुरुषाप्रमाणे तुम्हाला देखील कमी बोलायची सवय. मला वाटते स्त्रियांच्या तुलनेत पुरुष कमी बोलतात त्याचे अनेक कारण आहेत पण जे मला नव्याने उगले ते म्हणजे पुरुषांना अपमान सहज हाताळता येत नाही. कित्येकदा तर अपमान झाला नसला तरी एखाद्या तिरपट वाक्यालाच अपमान समजून त्यावर दुखी होतात. प्रसंगी सुडाची भावनाही मनात येते. असले अपमानासारखे प्रसंग कमीत कमी किंवा घडूच नयेत म्हणून त्यासाठी हातचं अंतर राखून संवादाची सुरुवात होते. हजरजबाबीपणा त्या पुरुषांकडे असते ते पुरुष तर मला पुरूषी नियमालाच अपवाद आहेत असच वाटतं.
5. विनोदाने घ्या
एखाद-दुसऱ्या वेळी जर कोणी तिरकसपणे बोललं की त्याला लगेच अपमान झाल्यासारखा प्रतिसाद द्यायचा नसतो. जमेल तितकं हसण्यावारी न्यायचं असतं पण बहुतेक पुरुषांना (विषेशतः वडीलधाऱ्या पुरुषांना) हेच जमत नाही. हे असले बारीक-सारीख प्रसंग येत जात असतात पण त्यांना मनाला लावून घेतल्याने अनावश्यक मनात किचकटता वाढते. नंतर तेच मानसिकता बिघडवतात आणि मग त्यांचा परिणाम शरीरावरही दिसून येतो. माझ्या रोजच्या निरीक्षणातून मी जी बाब सर्वत्र बघितली ती हीच की ज्या पुरुषांना अपमान आणि अपयश सहज हाताळता येतो त्यांनाच निरोगी दीर्घायुष्य लाभतं.
6. मानसिक शांतीसाठी
निरोगी आयुष्याला लागणारे सर्व शारीरिक गोष्टी तुम्हाला चांगल्याच माहीत आहेत. जसे वेळेवर झोपणं, वेळेवर जेवणं, घरच्या खाण्याला प्राधान्य देणं, जागरण न करणं, माफक व्यायाम करणं पण गाडी अडते नेमकी मानसिक गोष्टीबाबत. इतरांकडून जास्त अपेक्षा न करणं हे सर्व पुरुषाने पाळावे अशीच गोष्ट वाटते मला. घरात सर्वांवर नियंत्रण मिळवून काहीही हाशिल होणार नसते. मानसिक सुख स्वतंत्र दिल्यानं प्राप्त होते. नियंत्रणात ठेवून फक्तच स्वतःच मानसिक ताण वाढतो.
7. संयमित अपेक्षा ठेवा

वहिणीकडून तितक्याच अपेक्षा ठेवा जितक्या माझ्याकडून ठेवता. माझी घर कामातील स्थिती तुम्हाला चांगलीच माहित आहे. स्वयंपाक तर विचारूच नका. पिढीतील वाढलेल अंतर ह्या गोष्टी स्वीकारायला सोप ठरणार नाही. सगळ्या गोष्टीं नाही होणार कदाचित तुमचे नियमानुसार पण पप्पा हीच तडजोड ठरेल तुमच्या सुखी आयुष्याची गुरुकिल्ली.
8. सकारात्मक व्हा
दूरदर्शन वरच्या बातम्या लागल्यावर आवाज वाढवून वाढवून बघणारे तुम्ही काही वर्षांपासून युट्युब स्क्रोल करायला लागलेत आणि शिकलेत पण. ह्या बदलाला जसं स्वीकारलं, त्याचे फायद्ये जसे सहजपणे पकडलेत तसेच इतर बाबींमधला देखील बदल स्वीकारायचा आहे. सुरुवात नकारात्मक विचारण्यात थांबून करायची आहे. खरंतर पहिलीच पायरी खूप मोठी सुचवली आहे मी. सामाजिक परिस्थितीने पुरुषांना निर्णय घेण्यासाठी पुढे केलं. त्यातल्या नकारात्मक बाजूशी त्यांना लढावं लागलं. स्वतःला कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी, हे करणं भाग असेलही पण नेहमीच स्वतःची कल्पना नकारात्मक दिशेने पुढे रेटत नेऊन स्वतःच कमालीच्या अस्वस्थ होता. त्यातून तयार झालेली भीती प्रत्येक वेळेस खरी असते असं नाही. सावधगिरी बद्दल हयगय करायचे असते असे कधीच म्हणायचं नव्हता मला, पण सुरक्षिततेच्या बाबतीत व्यावहारिक व्हायला सांगते. सतत बातम्यातून पाजळणारी नकारात्मकता सततच्या संपर्कामुळे आपल्या स्वभावाचा भाग कधी होऊन जाते ते आपल्यालाही कळत नाही.
9. नविन आवडी निवडी
तुमची फिरायला जाण्याबाबतची अनुत्सुकता हा आईसोबतचा चर्चेचा आमचा मुख्य विषय असतो. आईला फिरायला जायला आवडतं कारण तिच्या रोजच्या जगण्यात आलेला तोचतोचपणा घालवण्यासाठी असलेल्या सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग आहे. आपच्या लहानपणी आमच्या शाळा, ट्युशन्स, क्लासेस इतक्या सगळ्यात फार काही मोकळा वेळ मिळाला नाही तुम्हा दोघांना पण आता रिटायरमेंट नंतर मिळालेल्या रिकाम्या वेळात मात्र नक्की फिरायला जा. तुम्हाला फार दूर आवडत नसेल तर जवळ जा आणि प्रवासात आईकडे बघा. बघा तिच्या चेहऱ्यावर आलेला ताजेपणा त्यातून तुम्हाला अनेक प्रश्नांची उत्तरे कळत नकळत मिळतील. गावाशेजारी असलेल्या मंदिराला भेट द्यायचं निमित्त करून फिरण्याचा श्री गणेशा करून टाका.
10. कलेच्या विश्वात

तुम्हाला फिरायला जायची आणि कलाक्षेत्रात रमायची आवड एकूणच बेताची. जीवनात रंग भरणारी कला कशी काय तुम्हाला कधीच आवडली नाही. निरस वाटणाऱ्या आयुष्याला तमाम रंगांनी उधळून टाकणाऱ्या अनेक कला आज आपल्या पर्यंत सहज पोहोचल्या आहेत. त्यातील काही कलांचा आता उतार वयात आधार घ्या म्हणजे वेळ छान निघून जाईल. कुटुंबाला बांधण्याच्या कलेचा खरा कलाकार कलेच्या इतर शाखेत देखील रमतो हे बघतांना सुखातील सर्वच.
का ह्या वस्तू तुमच्या नजरेखालून जाव्यात?
आपल्या kutumbwarta.com च्या प्रत्येक पोस्टच्या शेवटी, आम्ही काही असे उत्पादने सुचवतो जी पोस्टच्या विषयाशी संबंधित असतात आणि जी आपले जीवन अधिक चांगले करण्यासाठी मदत करू शकतात. ” ११ सर्वोत्तम आणि अनोख्या गिफ्ट आयडिया फॉर डॅड” या ब्लॉगमध्ये, आम्ही आपल्या वडिलांसाठी दिलेली गिफ्ट आयडिया सुचवली आहे. हे गिफ्ट्स खासकरून त्या वेळी उपयुक्त ठरतात जेव्हा मुली आपल्या वडिलांसोबत अशा गोष्टींवर चर्चा करायला धाडस दाखवतात, ज्या पारंपरिक भारतीय कुटुंबांमध्ये नेहमीच होत नाहीत. हे गिफ्ट्स वडिलांसोबतच्या नात्यातील भावना व्यक्त करण्यासाठी आणि संबंध मजबूत करण्यासाठी मदत करू शकतात.
जर आपल्याला हे जाणून घ्यायचं असेल की या गिफ्ट्ससाठी आपलं लक्ष का आवश्यक आहे, तर आपण आमच्या पार्टनर साइट awareandbeware.com वर त्याची संपूर्ण समीक्षा वाचू शकता. त्या समीक्षेत प्रत्येक उत्पादनाच्या वैशिष्ट्यांवर, फायदेशीर गुणधर्मावर आणि संभाव्य तोट्यावर सखोल चर्चा केली आहे, ज्यामुळे आपल्याला सूचित निर्णय घेणं सोपं होईल. या गिफ्ट्सच्या बारकाईने समजून घेण्यासाठी आपण पूर्ण समीक्षा वाचण्याची शिफारस करतो.
